क्रिडाआंतरराष्ट्रीयमनोरंजनराष्ट्रीय

एकाचवेळी पाच दिग्ज क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी संपल्यानतंर क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा

भारतीय क्रीडा विश्वात एकच खळबळ

Spread the love

नवी दिल्ली (जनमंथन वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघात दमदार कामगिरी करणाऱ्या पाच दिग्ज क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी संपल्यानतंर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या क्रिकेटपटूंमध्ये बंगालचा दिग्गज फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari), झारखंडचा फलंदाज सौरभ तिवारी(Sourabh Tiwari), वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन (Varun Aaron), मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) आणि विदर्भाचा रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार फैज फजल (Faiz Faizal) यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. आता या क्रिकेटर्सच्या कारकिर्दी बद्दल जाणून घेऊया.

  • मनोज तिवारी
    बंगालच्या मनोज तिवारीने बिहार विरुद्ध संघाला विजय मिळवून देत क्रिकेटला अलविदा केलं. ३८ वर्षीय मनोज तिवारी तब्बल १९ वर्ष बंगालसाठी खेळला. गेल्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वात बंगलाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०००० हून अधिक धावा केल्या आहेत.
  • सौरव तिवारी
    सौरव तिवारी गेली १७ वर्ष झारखंड संघासाठी खेळत आहे. त्याने ११५ प्रथम श्रेणी सामन्यात ८०३० धावा केल्या आहेत. यात २२ शतकं आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे.
  • वरुण अ‍ॅरोन
    वरुण अ‍ॅरोनला भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळाली नाही. सातत्याने दुखापतीमुळे वरुण संघातून बाहेर राहिला. वरुण अ‍ॅरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ६६ सामन्यात १७३ विकेट घेतल्या आहेत.
  • फैज फजल
    फैज फजल तब्बल २१ वर्ष विदर्भ संघाकडून खेळला. त्याच्या नेतृत्वात विदर्भने २०१८ मध्ये रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या हंगामात फैज फजलनने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फैज फजलने ९१८३ धावा केल्या आहेत.
  • धवल कुलकर्णी
    मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्विग, लाईन आणि लेंथसाठी धवल कुलकर्णी ओळखला जात होता. हमकास विकेट घेणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. त्याने ९५ प्रथम श्रेणी सामन्यात २८१ विकेट घेतल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×