राजकीयराष्ट्रीय

जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक

Spread the love

रांची (जनमंथन वृत्तसंस्था) : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीत अडकलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Former Chief Minister Hemant Soren) यांना अखेर बुधवारी, दि. ३१ जानेवारी रोजी रात्री राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ईडीने सोरेन यांना अटक करण्यात आली. त्याआधी झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने चंपाई सोरेन यांना नवीन मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. कसून चौकशी केल्यानंतर असून हेमंत सोरेन यांना केव्हाही अटक होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हेमंत सोरेन यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता. त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे ४८ आमदार आहेत. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाकडे २९, काँग्रेसकडे १७, आरजेडीकडे एक आणि सीपीआय (एमएल) कडे एक आमदार आहे. विरोधी पक्ष एनडीएकडे ३२ आमदार आहेत. यामध्ये भाजपचे २६, एजेएसयु ३, एनसीपी (एपी) १ आणि २ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तसेच एक जागा रिक्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×