
बीड | जनमंथन वृत्तसेवा : दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ यांना नुकताच दैनिक प्रभास केसरी चा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप चला थोडंसं वाचूया च्या माध्यमातून बशीरगंज ते थोरातवाडी, जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याची मोहीम चालविण्यात येत आहे. या दोन्हीचा योग साधून बीड नगर परिषदचे मुख्याधिकारी यांचे सहाय्यक राहिलेले सेवानिवृत्त अण्णासाहेब चाळक यांनी दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ यांना मिळालेल्या पुरस्काराप्रित्यर्थ रस्त्यावर लावण्यासाठी वटवृक्षाचे रोप सप्रेम भेट देत दुग्ध शर्करा योग साधला. यावेळी सायं. दैनिक बीड किसान चे मुख्य संपादक शेख कामरान, उपसंपादक सय्यद दाऊद आणि शेख फरहान यांनी चाळक यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.