तयारीला लागा ! राज्यात १७४७१ पोलिसांची भरती होणार

मुंबई (जनमंथन वृत्तसेवा) : राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. ही पोलीस भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर गृह विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती (Maharashtra Police Recruitment) केली जाणार आहे.
जे तरूण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही खरच खुशखबर आहे. राज्यातील १०० टक्के पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक या विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. तब्बल १७४७१ जागा भरल्या जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी या पोलीस भरती वरून राज्यात वाद निर्माण झाला होता. पोलिसांची कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र त्यावरून वाद झाला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
#maharashtra_police_bharti_2024 #maharashtra_police #police_bharti_2024