
चिंचवड (जनमंथन वृत्तसेवा) : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाचे यंदा ४६२वे वर्ष झाजरे झाले. संजीवन समाधी महोत्सवाची सांगता मंगळवारी (दि. २ जानेवारी) दुपारी १२ वाजता महाप्रसादाने झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दि. २९ जानेवारी २०२३ ते २ जानेवारी २०२४ या कालावधीत चिंचवड येथे श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६२वा संजीवन समाधी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मागील चार दिवसांपासून महाप्रसादाची तयारी सुरू होती. यामध्ये शेकडो भाविकांनी विविध कार्य करत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज महोत्सवात आपली सेवा रुजू केली.
काल दि. २ जानेवारी रोजी दुपारपासून म्हणजेच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
पाच दिवस चाललेल्या महोत्सवात लाखो भाविकांनी सहभाग नोंदविला. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा महोत्सव अविस्मरणीय ठरला.