
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघातर्फे पथारी विक्रेत्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे.
जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे (Jan Shakti Pathari Vendor Welfare Association) अध्यक्ष संजय आल्हाट (President Sanjay Alhat) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रणजीत सोनावळे (Ranjit Sonavale), आनंद शिंदे (Anand Shinde), माया पंडित (Maya Pandit), योगिता दिवसे (Yogita Diwase), तेजस जोगदंड (Tejas Jogdand) हे पदाधिकारी अभियानात सहभागी झाले आहेत.

पथारी विक्रेत्यांमध्ये एकता, बंधुभाव, सदभावना व शिस्त निर्माण करुन व्यवसायाबाबत येणाऱ्या अडीअडचणी दुर करुन त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्य यांची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत.
शासनाकडून आलेले निर्णय, आदेश मागदर्शक तत्वे पथारी विक्रेत्यांपर्यंत पोहचण्यासाठी चालू परिस्थितीचे अद्ययावत माहिती विक्रेत्यांमध्ये पोहचविण्यात येणार आहे. व्यवसायविषयक धोरणांची व्यवसायीकांना जाणीव करुन शासनाला त्यांच्या धोरणांच्या अंमल बजावणीला भाग पाडणेसाठी व विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायात भेडसवणाऱ्या सद्यपरिस्थिती व भविष्यकालीन व्यवसायीकांना समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्व सामान्य गोरगरीब व्यवसायीकांना न्याय, हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन आपला हक्क मिळवण्यासाठी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघामध्ये, अभियानात मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
