मुंबईमहाराष्ट्र
पोलीस महासंचालक रजनीश शेठ पदावरून निवृत्त; विवेक फणसाळकरांकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार

मुंबई (जनमंथन वृत्तसेवा) : राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे आज, दि. ३० डिसेंबर रोजी (मध्यानानंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.