सांगलीकलामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची शरयू योगेश्वर मेटकरी गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम

Spread the love

रत्नदीप घाडगे | विशेष प्रतिनिधी

सांगली/विटा (जन मंथन वृत्तसेवा)  : भारती विद्यापीठ, पुणे (Bharati Vidyapeeth, Pune)  यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित परीक्षेत इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी शरयू योगेश्वर मेटकरी (Sharyu Yogeshwar Metkari) हिने गणित परीक्षेत राज्यात (Stood First In The State In The Competitive Examination of Mathematics Subject) येत ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची चमकदार कामगिरी असे समीकरणच झाले आहे. प्रशालेचे विद्यार्थी दरवर्षी राज्याच्या यादीत चमकत असतात. या वर्षी शरयू मेटकरी हिने या यादीत येत पुन्हा एकदा सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची पताका डौलाने फडकवली.
या परीक्षेत विविध इयत्ताच्या विद्यार्थ्यांनीही चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये इयत्ता चौथी मधील प्रणव वैभव जानकर (Pranav Vaibhav Jankar), षण्मुख अमोल हिंडे (Shanmukh Amol Hinde), पियुष संतोष ढवळे (Piyush Santosh Dhavale), नव्या शरद कदम (Navya Sharad Kadam), स्वराली दिलीप महाडिक (Swarali Dilip Mahadik), परशुराम आरसिंगगिरी (Parashuram Arsinggiri), स्वागत विजय साळुंखे (Swagat Vijay Salunkhe), इयत्ता सहावी मधील शौर्य सचिन लिपारे (Shaurya Sachin Lipare), जोया तोफिक बुबणाळे (Joya Tofiq Bubanale), अक्षता अमोल पोळ (Akshata Amol Pol), श्रीजल संतोष पाटणकर (Sreejal Santosh Patankar), इयत्ता नववी मधील सलोनी लक्ष्मण मोगरे (Saloni Laxman Mogre), आयुष अनिल घारे (Ayush Anil Ghare) आणि इयत्ता दहावी मधील यश सोमनाथ बुचडे (Yash Somnath Buchde) व गौरजा गजानन रंगाटे (Gaurja Gajanan Rangate) या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांच्या भरीव कामगिरीबद्दल भारती विद्यापीठच्या प्रमुख विजयमाला कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रशालेत मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी (Founder Raghuraj Metkari), अध्यक्षा रेखा शेंडगे (President Rekha Shendge), प्राचार्या वैशाली कोळेकर (Principal Vaishali Kolekar), कार्यवाहक योगेश्वर मेटकरी (Yogeshwar Metkari) यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना अभिजीत निरगुडे (Abhijit Niragude), तात्यासो शेंडगे (Tatyaso Shendge), राजू गारोळे (Raju Garole), स्वप्नाली भिंगारदिवे (Swapnali Bhingardive), मनीषा विभुते (Manisha Vibhute), नाझनीन शिकलगार (Nazneen Shikalgar) यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देशाने गेली २५ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून विटा येथील भारतमाता ज्ञानपीठची सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला ओळखली जाते. विविध सहशालेय उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला बसविण्यात व त्यांची तयारी करून घेण्यात प्रशाला नेहमीच तत्पर असते. या शाळेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात निपुण कामगिरी करताना दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×