पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवारी दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीतील सभागृह क्र. १ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूल उप आयुक्त आण्णासाहेब चव्हाण (Revenue Deputy Commissioner Annasaheb Chavan) यांनी कळविले आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही चव्हाण यांनी कळविले आहे.