पुणेगुन्हेगारी
Breaking News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर लग्नाच्या वाढदिवशीच गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Gangster Sharad Mohol Died) याच्यावर आज दुपारी जीवघेणा हल्ला झाला, यात त्याचा मृत्यू झाला आहे. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड इथे गोळीबार केला, यात मोहोळला चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज (Vanaz) येतील सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital, Kothrud) ला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहोळ याला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) हलवण्यात आले असून तेथे पाचशे होऊन अधिक लोकांचा जमाव जमला आहे.