पुणेगुन्हेगारी
कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू
हल्लेखोरानं झाडल्या तीन गोळ्या
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुणे शहरात भरदिवसा गोळीबार (Firing In Pune) झाला आहे. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड (Kothrud) परिसरात हा गोळीबार झाला. कुख्यात गुंड शरद मोहोळ (Notorious Gangster Sharad Mohol) याच्यावर कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी, त्यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.