एस.एम.युसूफ़ | विशेष प्रतिनिधी
बीड (जनमंथन वृत्तसेवा) : गुरुपौर्णिमेनिमित्त “संस्कार भारतीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात तथा पत्रकारितेत ३५ वर्ष स्पृहणीय काम केल्याबद्दल प्रा. सी. आर. पटेल यांचा आज त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना सन्मान पत्राचे वाचन व गुलाब पुष्प देऊन गुरुजनांनी हा सन्मान स्वीकारला. प्रा. सी. आर. पटेल आपल्या ३५ वर्षाच्या सेवेनंतर २०१४ साली सेवानिवृत्त झाले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज भारतात व भारताबाहेर उच्च पदावर कार्यरत आहेत. शिक्षकाच्या कार्याची हीच खरी पावती आहे. संस्कार भारती वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा दरवर्षी “गुरुपौर्णिमेला” सत्कार करते. अशाच प्रकारे यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक तथा पत्रकार सी. आर. पटेल यांचा यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्ताने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद वझे यांनी केले तर गणेश तालखेडकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताचे पूर्वअध्यक्ष भारत अण्णा लोळगे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, वासुदेव निलंगेकर, महेश वाघमारे, संतोष पारगावकर, लक्ष्मीकांत सौंदतीकर, अनिल कुलकर्णी, गणेश तालखेडकर, लक्ष्मीकांत खडकीकर, सुरेश साळूंके, केदार बहिरमल, गणेश स्वामी, अशोक कुलकर्णी, अंनत सुतनासे, जगदीश जाधव, महेश देशमुख व दत्ता घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.