राजकीयमहाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी
नागपूर (जनमंथन वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबतची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या पहिल्या टप्प्यात १७ राज्यं आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधल्या १०२ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. यात राज्यातल्या रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघांचा समावेश आहे. दि. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून दि. २८ मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. या मतदार संघांमध्ये दि. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, नागपूर मतदारसंघातून आजच्या पहिल्या दिवशी फक्त एक अर्ज दाखल झाला आहे.