येरवडा पोलिसांच्या तत्परतेमुळे बेपत्ता असलेल्या पतीचा लागला शोध!
API महेश लामखडे व पथकाने दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे व तत्परतेमुळे बेपत्ता असलेल्या पतीला शोधण्यात यश

✍🏻वसीम खान | जनमंथन वृत्तसेवा
पुणे : येरवडा पोलीस ठाणे हद्दीतील खडकी येथे राहणाऱ्या राजेश काशिनाथ गवळी हे मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी ०३:३० वाजेपासून राहत्या घरातुन बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी अपर्णा गवळी यांनी समक्ष येऊन येरवडा पोलीस ठाण्यात दिली. मोठी आर्थिक फसवणुक झाल्याने मानसिक तणावात असल्यामुळे स्वहस्ताक्षरीत “सुसाईड नोट” लिहून घरातून कोठेतरी निघुन गेले असल्याबाबतचे तक्रार पत्नी यांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे यांनी या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर इसमाचा तात्काळ शोध सुरू केला. लामखडे व पथकाचे तत्परतेमुळे बेपत्ता असलेल्या पतीला अवघ्या दोन तासांतच शोधून सुखरूप पत्नीच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे यांनी या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर इसमाचा तात्काळ शोध सुरू केला. लामखडे व पथकाचे तत्परतेमुळे बेपत्ता असलेल्या पतीला अवघ्या दोन तासांतच शोधून सुखरूप पत्नीच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काशिनाथ गवळी (वय ४३ वर्षे) हे मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी ०३:३० वाजेपासून राहत्या घरातुन बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी अपर्णा राजेश गवळी, (वय ४० वर्षे, दोन्ही रा. ४०१, शक्ती अपार्टमेंट, खडकी, पुणे) यांनी मंगलवार, दि. २४ डिसेंबर रोजी रात्री १०:४५ वा. चे सुमारास येरवडा पोलीस स्टेशन येथे समक्ष येऊन पती राजेश गवळी राहत्या घरातुन अभिषेक बिराजदार नावाच्या इसमाने त्यांची मोठी आर्थिक फसवणुक केल्याने ते मानसिक तणावात आहेत व त्यांच्या आत्महत्येसाठी अभिषेक बिराजदार हा इसम जबाबदार असल्याची स्वहस्ताक्षरीत “सुसाईड नोट” लिहून घरातून कोठेतरी निघुन गेलेले असून त्यांचा शोध घेण्यास विनंती केली. व त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग रजिस्टर नं. १५९/२०२४ प्रमाणे तात्काळ नोंद घेऊन त्याबाबत वरिष्ठांना व नियंत्रण कक्षास माहीती देण्यात आली. बेपत्ता इसमाचा मोबाईल फोन सतत बंद आढळून येत होता. म्हणून त्याचे वापरते मोबाईल क्रमांकाचे लास्ट लोकेशन काढले असता ते काल रोजीचे सायंकाळचे ०६:४५ वा. चे सुमारास खडकी परिसरातील होळकर ब्रिज, नदीपात्र येथे येत होते. त्यामुळे सदर बेपत्ता इसमाचे आत्महत्येबाबत संशय बळावत होता.
त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे, पोलीस फौजदार शिंदे व पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांनी बेपत्ता इसमाचे नातेवाईकांसह खडकी परिसरातील होळकर ब्रिज, नदीपात्र व उद्याने तपासले असता तो मिळून आला नाही. बुधवारी, दि. २५ डिसेंबर रोजीच्या रात्री ००:२२ वा. नमुद बेपत्ता इसमाने त्याचेकडील मोबाईल फोन सुरू केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे यांना तांत्रिक बाबीवरून समजले. त्यानुसार त्यांनी सदर मोबाईल फोनचे नव्याने लोकेशन काढले असता ते खडकी येथील चर्चच्या जवळील मोकळ्या मैदानातील येत होते. त्यानंतर लागलीच वरील पोलीस पथक हे सदर ठिकाणी रवाना होऊन त्यांनी तेथील मोकळ्या मैदानात बेपत्ता इसमाचा शोध घेतला असता अंधाऱ्या ठिकाणी सदरचा इसम विमनस्क अवस्थेत बसलेला आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन, ओळख पटवून येरवडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर इसमाचे समुपदेशन करून, आवश्यक ते सोपस्कार पार पाडून रात्री ०१:०० वा. त्यास त्याची पत्नी अपर्णा राजेश गवळी यांचे ताब्यात सुखरूप दिले. सदर इसमांचे नातेवाईकांनी पुणे पोलीसांचे वर नमूदप्रमाणे दाखवलेल्या तत्परतेबद्दल आभार मानले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Senior Police Inspector Ravindra Shelke) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे (Assistant Police Inspector Mahesh Lamkhade), पोलीस फौजदार शिंदे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व तांत्रिक विभागाचे पोलीस हवालदार किरण घुटे यांनी केली आहे.