शासकीय नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय परिषदेत एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान

वसीम खान | जनमंंथन वृत्तसेवा
बीड : शहरातील नीलकमल हॉटेलमध्ये शुक्रवार, दि. २९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आलेल्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय परिषदेत दैनिक जन मंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या दहा वर्षा पासून पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल बीड जिल्हा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सुवर्णा बेदरे-कुलथे यांच्या हस्ते एस.एम.युसूफ़ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, सहाय्यक संचालक (शुश्रुषा, मुंबई) डॉ. निलीमा सोनावणे, आरोग्य उपसंचालक, आरोग्य परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, डॉ. उज्वला वनवे, डॉ. शुभानंद शिंदे, डॉ. शोभा गायकवाड, सुपरिटेंडंट ऑफ नर्सेस रमा गिरी, क्षीरसागर शैलजा, शिला मोहीते, डॉ. चिंचकर बी.डी., डॉ. कदम अरूण, नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक उलका साळवे, प्रतिक जोशी, रोहन जोगदंड, सतीष बोराडे, रोहिनी शिनगारे यांच्यासह अनेक पत्रकार बांंधवांचीही प्रमुख उपस्थिती होती.