मुंबई (जनमंथन वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळालेल्या स्वप्निल कुसाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळे यांनी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला ‘कांस्यपदक’ प्राप्त करून दिले. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत शासनस्तरावरही त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. त्यांच्या एकंदरीत क्रीडाविश्वातील प्रवासाबद्दल कुसाळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०७:२५ ते ०७:४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय येथील माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.