पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील मागास व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना (Backward and Minority Students) मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न व्हावा, या करिता इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप (Incredible Samajh Seva Group) तर्फे इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिस ऍकॅडमीची (Incredible Civil Service Academy) स्थापना करण्यात येत असून उद्घाटन कार्यक्रम सावित्रीबाई फुले जयंती (SavitriBai Phule Jayanti) दिनी म्हणजेच दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ०५:३० वाजता सर्व्हे नं. ५९/१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. आय.एफ.एस. अधिकारी ए. के. खान (I.F.S Officer A. K. Khan), पुणे पोलीस उपयुक्त (झोन-५) आर. राजा (आय.पी.एस. अधिकारी) (Pune Police Deputy Commissioner Zone-5 R. Raja), पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Deshmukh), समाज विकास विभागाचे रामदास चव्हाण (Ramdas Chavan) हे उपस्थित राहणार आहेत. या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षा, यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., पोलीस भरती व इतर सरकारी नोकरीसाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संस्थापक असलम इसाक बागवान (Founder Aslam Isak Bagwan) यांनी दिली.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
पुण्यात नूतनीकरण केलेल्या मध प्रक्रिया युनिट संस्थेचे उद्घाटनOctober 4, 2024