पुणेतंत्रज्ञान

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे उद्घाटन संपन्न

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात College of Engineering of Bharti Vidyapeeth Abhimat University) आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे Faculty Development Programme) उद्घाटन सिगेट कंपनीच्या संशोधन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख निरंजन पोळ (Niranjan Pol, Head of Research Engineering Department of Seagate Company) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अटल अकॅडमीच्या सहकार्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ‘व्ही.एल.सी.आय. डिझाईन मधील प्रगती’, या विषयावर आयोजित करण्यात आले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विदुला सोहोनी (Dr. Vidula Sohoni), उपप्राचार्य डॉ. सुनीता जाधव (Dr. Sunita Jadhav), डॉ. सचिन चव्हाण (Dr. Sachin Chavan), कार्यक्रम समन्वयक डॉ. धीरज ढाणे (Dr. Dheeraj Dane), डॉ. अजय कुशवाह (Dr. Ajay Kushwaha), विभाग प्रमुख डॉ. श्रुती ओझा (Dr. Shruti Ojha) उपस्थित होते. कार्यशाळा, व्याख्याने, प्रत्यक्ष कार्यानुभव यांचा समावेश या प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात आला आहे. त्यातून उद्योगक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, तज्ज्ञ, संशोधक आणि प्रशिक्षक यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

‘संप्रेषण प्रणाली, इंटरनेट ऑन थिंग्स, वैद्यकीय उपकरणे यामध्ये व्ही.एल.सी.आय. डिझाईनचे महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे रोजगार आणि कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होणार आहेत’, अशी माहिती निरंजन पोळ यांनी दिली. डॉ. विदुला सोहोनी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×