पुणेगुन्हेगारी

चंदननगर पोलिसांतर्फे टोळी प्रमुख अनुज यादव व त्याच्या सहा साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत ११० गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Spread the love
गुंडांना प्रतिकार करुन, जखमी नागरीकांचा जीव वाचविणाऱ्या रणरागिनी महिला पोलीस अंमलदार सिमा वळवी यांचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार व त्यांच्या धाडसामुळे गुन्हेगारांना जेरबंद करुन मोक्का अंतर्गत कारवाई करता आली.

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : वडगावशेरी येथील दिगंबरनगर येथे रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास चंदननगर पोलीस ठाण्याचे (Chandan Nagar Police) महिला पोलीस अंमलदार सीमा वळवी (Police Constable Seema Valvi) ह्या बंदोबस्त संपवुन निवासस्थानी जात असताना, आनंदपार्क रस्त्यावर काही तरुण आप-आपसात भांडण करीत आसल्याचे दिसून आल्याने, त्यांनी सदर ठिकाणी थांबुन त्यांना आप-आपसात भांडु नका असे समजावुन सांगत असतानाच त्यांचे पाठीमागुन एका इसमाने हातामध्ये धारधार हत्यार घेऊन पळत आला व त्याठिकाणी जमा झालेल्या इसमांना मारहाण करु लागला. तसेच इतर इसमांनीही तेथे पडलेले दगड विटांनी एकमेकांना तुफान मारहाण करु लागले. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार सीमा वळवी यांनी प्रसंगावधान राखुन व गुन्हेगारांना एकटीने प्रतिकार करुन त्या जखमी इसमांची सुटका करून घटनास्थळी इतर पोलीस स्टाफ बोलावून घेऊन, भांडण करणारे आरोपींना गुन्हा घडल्यानंतर त्यांचा पाठलाग करुन अवघ्या २० मिनीटांमध्ये ५ आरोपींना ताब्यात घेतले. त्यामुळे गुन्हा उघडकीस येऊन, गुन्ह्यातील आरोपी नामे १) अनुज जितेंद्र यादव (वय १९ वर्षे, रा. आनंदपार्क वडगांवशेरी, पुणे), २) हरिकेश टुणटुण चव्हाण (वय १८ वर्षे) ३) आकाश भारत पवार (वय-२३ वर्षे, रा. सदर) ४) अमोल वंसत चौरघडे ५) संदेश सुधिर कांबळे यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच भांडणा मध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभ संतोष पाडाळे, ऋषिकेश ढोरे, यांना तात्काळ औषधोपचारा कामी हॉस्पीटलमध्ये दाखल केलेले आहे.

या घटनेबाबत जखमी मुलगा नामे सौरभ संतोष पाडाळे, (वय २२ वर्षे, रा. पाडाळे निवास बिकानेर स्वीटचे वरती, सोमनाथनगर, वडगांवशेरी, पुणे) यांनी त्यास त्याचा मित्र नामे ऋषिकेश ढोरे, अभि आगरकर, योगेश कदम यांना आरोपींनी लोखंडी धारधार हत्याराने, दगड व विटांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले म्हणून त्यांचे विरुध्द चंदननगर पोलीस ठाणे गु.र.नं.५९१/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२६,३२४, १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा. पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) १३५, क्रिमीनल लॉ अमेडमेंट कलम ३ व ७ कलमान्वये दिनांक २५/१२/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलिसांतर्फे सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास केला असता आरोपी अनुज जितेंद्र यादव (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असल्याचे दिसुन आले तसेच अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला होता .सदर टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचेवर यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३(१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ शशिकांत बोराटे यांच्या मार्फतीने अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५९१/२०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२६,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३). १३५, क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट कलम ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मान्यता अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे) रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

सदरची कामगिरी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, पोलीस उप-निरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, पंकज मुसळे, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांनी केली आहे. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×