राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण करा
यशवंत पवार यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
एस.एम.युसूफ़ | विशेष प्रतिनिधी
सोलापूर (जनमंथन वृत्तसेवा) : राज्यातील वृत्तपत्र विक्रेते म्हणजे लोकशाही चा चौथा स्तंभ अतिशय महत्वाचा घटक असून बारा महिने ऊन, वारा, पाऊस, थंडी, महापुर अश्या कोणत्याही संकटाची तमा अथवा भीती न बाळगता जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेला पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करत असतात मात्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेते राज्य सरकारच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. अश्या वंचित वृत्तपत्र विक्रेत्यांची अवस्था अतिशय दयनीय व बिकट असून उतारवयात त्यांना मानधन व पेन्शन नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेते यांची परिस्थिती फारच नाजूक होते.
महाराष्ट्र राज्यात जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक वृत्तपत्र विक्रेते आहेत. त्यांना उतारवयात सन्मानाने जगता यावे म्हूणन महाराष्ट्र राज्य सरकार ने राज्यातील वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून वृत्तपत्र विक्रेते यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप, कार्यकारी संपादक शहानवाज कंपली, दैनिक लोकशाही चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.