टोकियो (जनमंथन ऑनलाईन) : जपानला (Tokyo, Japan) नव्या वर्षाच्या (New Year) पहिल्याच दिवशी भूकंपाचा (Tsunami, Japan Earthquake) मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल इतकी होती. जपान मेटेरॉलॉजिकल एजन्सीने त्सुनामीचा इशारा दिला आहे. इशिकावा, निगाता आणि टोयामा किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लागोपाठ भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे.
उत्तर मध्य जपानमध्ये भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. एनएचकेने दिलेल्या वृत्तानुसार, निगाता प्रांतात काशीवाकी शहरापासून ४० किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. अद्याप जिवीत किंवा वित्तहानीबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये काही घरांचे नुकसान झाल्याचं दिसतंय.
जपानमध्ये गुरुवारीसुद्धा भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. कुरिल द्विपमध्ये भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. मात्र यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.