गुन्हेगारीपुणे
पुण्यातील ‘हीट अँड रन’ प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालयात

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : राज्यभरात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या कार अपघाताची. या अपघातामध्ये दोन जणांचे जीव गेल्यामुळे समाजातून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. दोन जणांचे जीव घेऊन देखील श्रीमंत बापाचा पोरगा असल्यामुळे त्याला जामीन दिली जात आहे, असा एकंदरीत समज समाजात निर्माण व्हायला लागला.
यामुळे याची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देत पोलिसांची बैठक घेतली. पुण्यात अल्पवयीन मद्यधुंद चालकाने दोघांचा जीव घेतला. पोलीस या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होत आहे.