पुणेकलातंत्रज्ञानशैक्षणिकसामाजिक

पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना २१ व्या पशुधन गणनेसाठी दिले प्रादेशिक स्तरावरचे प्रशिक्षण

महाराष्ट्र, दीव-दमण, दादरा व नगर हवेली येथील अधिकाऱ्यांचा समावेश

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग (डी.ए.एच.डी.) मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने गुजरात सरकारच्या सहकार्याने “२१ व्या पशुधन गणनेसाठी सॉफ्टवेअर (मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन/डॅशबोर्ड) आणि प्रजातींवरील प्रादेशिक प्रशिक्षण कार्यशाळा राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसाठी आयोजित केली होती. ही कार्यशाळा पुणे येथे पार पडली. ज्याचा उद्देश महाराष्ट्र, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली या राज्यांमधील राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना सप्टेंबर-डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या २१ व्या पशुधन गणनेसाठी नव्याने सुरू केलेल्या मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशनचे प्रशिक्षण देणे हा होता.”

पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी आभासी स्वरूपात २१ व्या पशुधन गणनेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवरील पशुधन क्षेत्राचा प्रभाव आणि पशुधन क्षेत्राच्या उत्पादनाच्या जागतिक व्यापाराच्या दृष्टीने भारताची स्थितीवर आपले विचार मांडले. त्यांनी महिलांचा सहभाग आणि या आवृत्तीत पशुधन गणनेत समाविष्ट केल्या जाणार्‍या पशुपालक समुदायाचे महत्त्व सुद्धाअधोरेखित केले.

Department of Animal Husbandry and Dairying imparted regional level training to State and District Nodal Officers for 21st Livestock Census.

भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सल्लागार जगत हजारिका यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन आय.सी.ए.आर. – एन.बी.ए.जी.आर. चे संचालक डॉ. बी. पी. मिश्रा, महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत झाले.

जगत हजारिका यांनी २१ व्या पशुधन गणनेच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित भागधारकांच्या सामूहिक जबाबदारीवर जोर दिला. अचूक आणि कार्यक्षम डेटा संकलनासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या २०२४ वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. या २०२४ कार्यशाळेमुळे जिल्हा आणि राज्य स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांचे पशुधन गणनेसाठी यशस्वी प्रशिक्षण मिळवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी एक मंच तयार झाला.

कौस्तुभ दिवेगावकर यांनी पायाभूत स्तरावर सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि क्षमता निर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि अन्न सुरक्षेत पशुधन क्षेत्राची महत्त्वाची भूमिका विशद करून या गणनेच्या बारकाईने नियोजन आणि अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली. यातून गोळा होणाऱ्या आकडेवारीमुळे भविष्यातील उपक्रमांवर लक्षणीय परिणाम होईल आणि या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज होऊ अशी आशा व्यक्त केली.

डॉ. बी. पी. मिश्रा यांनी अचूक प्रजातींच्या ओळखीच्या महत्त्वावर भर दिला, विविध पशुधन क्षेत्राच्या कार्यक्रमांसाठी अचूक आकडेवारी आणि शाश्वत विकास ध्येयांच्या (एस.डी.जी.) राष्ट्रीय निर्देशक संरचना (एन.आय.एफ.) तयार करण्यासाठी याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी या गणनेत होणार्‍या प्रजातींच्या विविधतेवर तपशीलावार सविस्तर सादरीकरण प्रस्तुत केले.

डी.ए.एच.डी. च्या सॉफ्टवेअर टीमने २१ व्या पशुधन गणना सॉफ्टवेअरच्या पद्धती आणि २०२४ प्रत्यक्ष अनुप्रयोगांवर तपशीलवार सत्रांचा समावेश केला होता. राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि डॅशबोर्ड सॉफ्टवेअरवर प्रशिक्षण दिले गेले, ज्यामुळे ते त्यांच्या संबंधित जिल्हा मुख्यालयात गणना करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊ शकतील.

डी.ए.एच.डी. मधील पशुधन आकडेवारी विभागाचे संचालक व्ही.पी. सिंह यांनी धन्यवाद प्रस्ताव आणि आभार प्रदर्शनाने कार्यशाळेचा समारोप केला. त्यांनी सर्व मान्यवरांचे आणि भागधारकांचे त्यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×