पुणेगुन्हेगारी
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ७ मध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
दत्तात्रय कुरळे (Police Sub Inspector – Dattatray Kurale) असे मृतदेह आढळून आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पोलिसांच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलीस शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झालेल्या दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.