पुणेराजकीयव्यापारसामाजिक

Big Breaking | निकाल लागण्यापूर्वीच पुणेकरांना महागाईचा झटका! सीएनजी च्या दरात 2 रुपयांनी वाढ

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : यापूर्वी मतदानाचे निकाल लागला की गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असे. आता मात्र निकाल लागण्यापूर्वीच सीएनजी च्या दरात तब्बल २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने आजपासून (शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर) प्रति किलो २ रुपयांनी सीएनजी च्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी सीएनजी चा दर प्रती किलो ८५.९० रुपये होता. आता तो ८७.९० रुपये प्रती किलो राहणार आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालक, कॅब चालकांना दरवाढ झाली असल्याचे समजले.

यापूर्वी दि. ९ जुलै २०२४ रोजी सीएनजी च्या दरात प्रती किलो दीड रुपये वाढ करण्यात आली होती. महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजी च्या दरात प्रति किलो २ रुपये वाढ केली आहे. मुंबई व परिसरात सीएनजीचा दर ७७ रुपये प्रती किलो झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×