पुणेमहाराष्ट्र
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील कोरेगाव भीमा येथे दि. १ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी, दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक दि. १ जानेवारी २०२४ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.