पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली; पृथ्वीराज बी. पी. नवे अतिरिक्त आयुक्त

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr. Kunal Khemnar) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सरकारने पृथ्वीराज बी. पी. (IAS Prithviraj B. P.) यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉ. खेमनार यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन बराच काळ लोटला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ. खेमनार यांची शासनाने पुणे येथील साखर आयुक्तपदी बदली केली आहे. तर डॉ. खेमनार पुण्यातच राहणार आहेत. खेमनार यांनी आपल्या कार्यकाळात घनकचरा विभाग आणि मालमत्ता कर विभागात अनेक नवनवीन कल्पना राबवून महापालिकेला पथदर्शी बनविण्याचे काम केले आहे.
दरम्यान, डॉ. खेमनार यांचे पद रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेत तातडीने नवीन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी शासनाने पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज बी. पी. हे नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ (CEO of Nagpur Smart City) म्हणून कार्यरत होते.