भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल कंपनी बोर्डाचा निधी उभारणीचा विचार
मुंबई : जनमंथन वृत्तसेवा
भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल [इंडिया] लिमिटेड (Bhatia Communications and Retail [India] Limited) [बीएसई . ५४०९५६] मोबाईल हॅंडसेट्स, टॅबलेट, घरगुती उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किरकोळ आणि घाऊक वितरण व्यवसायात गुंतलेली एक अग्रगण्य कंपनी असून कंपनीने दि. २० जुलै रोजी जकम्पनीच्या मंडळाची बैठक होणार असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीत २०२४ च्या सर्व आवश्यक मंजुरीच्या अधीन असलेले वोरंट, इक्विटी शेअर्स/परिवर्तनीय सिक्युरिटीज जरी करून निधी उभारणीचा आणि वाय्व्साय वाढीला गती देतानाच कंपनीच्या दीर्घकालीन आर्थिक संसाधनांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार होणार आहे. यापूर्वी, कंपनीने ३१ अमरचा २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी मजबूत कमाईची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ साठी कंपनीने एकूण ४१५ कोटी चा महसूल दर्शविला असून यामध्ये २० टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. EBITA वार्षिक २५ टक्के वाढला आहे . जो १८.४५ कोटी झालेला आहे. तर कंपनीच्या नफ्यात वार्षिक ३६ टक्के वाढ झाली असून हा नफा ११.५३ कोटी इतका झालेला आहे. भाटिया कम्युनिकेशन्स अँड रिटेल [इंडिया] लिमिटेड हि कंपनी मोबाईल हँडसेट, डेटा कार्ड, मोबाईल ऍक्सेसरीज, एअर कंडिशनर्स, वाशिंग मशीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या व्यापाराच्या किरकोळ आणि घाऊक वितरण व्य्वसयता गुंतलेली कंपनी आहे.
संकलन – संयोजन : सुबोध रणशेवरे
संपर्क : ९८३३१४६३५६
ई-मेल : subodh.ranshevre@ rediffmail.com)