पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : राज्यात लोकसभा निवडणुकीआधीच प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ५८ आय.पी.एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले होते. त्यानंतर आज (सोमवार, दि. ५ फेब्रुवारी) रोजी राज्य शासनाकडून राज्यातील ७ सनदी (IAS OFFICERS) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
राज्याचे सध्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांची साखर आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी माजी सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kawade) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुण्याचे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून सध्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांची बदली करून त्यांना सहकार आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.
अनिल कवडे हे येणाऱ्या काही दिवसातच निवृत्त होणार असून त्यांची प्रशासकीय सेवा केवळ काही दिवसांची राहिली आहे. ते २००३ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध पदांवर कार्य केले आहे. सहकार विभागातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांनी महसूल, भूसंपादन, जिल्हा पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी या पदांवर काम केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून ते सहकार आयुक्त पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली होऊन त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील या अधिकाऱ्यांची झाली बदली :
१. सौरभ राव (Saurabh Rao) – (IAS-2003) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
२. अनिल एम. कवडे (Anil M. Kawade) – (IAS-2003) आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. अनिल पाटील (Anil Patil) – (IAS-2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
४. डी. के. खिल्लारी (D. K. Khillari) – (IAS-2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. राहुल गुप्ता (Rahul Gupta) – (IAS-2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव, सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, छत्रपती संभाजी नगर
६. मुरुगनंथम एम. (Muruganantham M) – (IAS-2020) प्रकल्प अधिकारी, आय.टी.डी.पी., चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
७. यशनी नागराजन (Yashni Nagarajan) – (IAS-2020) प्रकल्प अधिकारी, आय.टी.डी.पी. पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.