पुणेकलातंत्रज्ञानशैक्षणिकसामाजिक
भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये बी.बी.ए., बी.सी.ए. विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम
नवीन शैक्षणिक वर्षास होणार आरंभ
पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)’ मध्ये बी.बी.ए., बी.सी.ए. अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला असून सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्र इंटेलिजन्स ऍकॅडमीचे संचालक डॉ. आर. बी. डहाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)’ चे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे अध्यक्षस्थानी असणार आहेत.’आरंभ -२०२४’ असे या इंडक्शन प्रोग्रॅमचे नाव असून तो दि. ५ ऑगस्ट पासून १७ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.