फिनेटक सोलुशन्सच्या मदतीने एमएसएमई क्षेत्रात ३० दशलक्ष नोकऱ्यांची संधी
मुंबई : जनमंथन वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेंव्हा मुंबईला भेट दिली होती तेंव्हा मुंबईला जगाच्या फिनटेक राजधानीत रुपांतरीत करण्याचा दृष्टिकोन मांडला होता. पंतप्रधानांच्या याच दृष्टीकोनाची वास्तवात अंमलबजावणी करण्याच्या हेतूने वर्ल्ड ट्रेंड सेंटर (World trend Centre), मुंबई आणि इंडिया असोशिएशन ऑफ इंडस्ट्रीजच्या (India Association of Industries) वतीने येत्या ८ ते १० ऑगस्ट दरम्यान वर्ल्ड ट्रेंड येथे ९ व्या जागतिक आर्थिक शिखर परिषदेचे (Economic Summit) आयोचजण करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या व्हिजनला प्रत्यक्षात आणण्यासाठी या शिखर परिषदेत नावीन्य, गुंतवणूक आणि कौशल्य विकासावर प्रकाश टाकला जाईल. हा उपक्रम फिनटेक क्षेत्राचे महत्त्व अधोरेखितकरेल ज्या फिनटेक ने १.४ अब्ज लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. नवोन्मेषी उद्योजकांना प्रोत्साहन, एमएसएमई स्पर्धात्मकता आणि रोजगार वाढविण्यासाठी फिनेटकच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकणे हा या समिट चा उद्देश असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाद्वारे (Ministry of MSME) समर्थित असलेला हा अकार्यक्र्म आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील प्रादेशिक फिनटेक हब म्हणून मुंबईला स्थान देण्यासाठी एक रोडमॅप तयार करेल, असे वर्ल्ड ट्रेड चे चेअरमन डॉ. विजय कलंत्री यांनी सांगितले .
संकलन – संयोजन : सुबोध रणशेवरे
संपर्क : ९८३३१४६३५६
ई-मेल : subodh.ranshevre@ rediffmail.com)