शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदानबहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा
पिंपरी (जनमंथन वृत्तसेवा) : वाल्हेकरवाडी येथील बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित शनिवार, दि. २७ एप्रिल रोजी करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार तर सुर्योदय ऊर्फ बाबू शेट्टी यांना विशेष पुरस्कार बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी इंडियन आयडॉल सोनी टीव्ही, सुर नवा ध्यास नवा, कलर्स मराठी फेम गायक रॉकस्टार संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. फॉरेनला धनी गेला ग बाय, तिथं जन्मले भिमराव सखे बाई गं, कभी झुकेगा नही साला, नको मला दाग दागिना, राजा राणीच्या जोडीला, भीम का बच्चा, भीमराज की बेटी या गाण्याला उपस्थितांना उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आदेश नवले, पल्लवी वाल्हेकर, बिभीषण चौधरी, पल्लवी मरकड, सोमनाथ भोंडवे, नितीन गवळी, मधुकर बच्चे, राजू दुर्गे आदी उपस्थित होते. मनोज तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शेषराव लोमटे, सचिव बुद्धी सागर आठवले, खजिनदार दादा गणगे, कार्याध्यक्ष श्रीकांत वाघमारे, याचबरोबर उत्तरेश्वर पालके, अमोल डंबाळे, बालाजी पतंगे, अंकुश तेलंग, दीपक तोरडमल, राहुल जगताप, गौतम गायकवाड, अनंत मस्के, कचरू पालके, स्वप्नील बनसोडे, महावीर जगताप, युवराज जगताप, सुधाकर सरेकर, बालाजी कांबळे, कल्याण शिंदे, एकनाथ भोकरे, केशव कटारे, श्रीनिवास सोनवणे, लहू मस्के, अरुण शिंदे, पोपट चौरे, पिनू गिरमे, अमोल वाघमारे, जाहीर जगताप, सुरेश साठे, प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.