पुणेराजकीय

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस भवन येथे बैठक संपन्न

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune City District Congress Committee) वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (President Arvind Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी व ईच्छूक उमेदवारांची बैठक पार पडली. सर्व प्रथम सदर बैठकीत मुंबई येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईत दाखल झाली अतिशय यशस्वीपणे भव्य – दिव्य सभा झाली म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड (Maharashtra Pradesh Congress General Secretary Adv. Abhay Chhajed) यांनी आनंदाचा ठराव मांडला. त्यास चिटणीस संजय बालगुडे यांनी अनुमोदन दिले तर उपस्थितांनी हात वर करून ठराव समंत केला.

     यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती संदर्भात साधक बाधक चर्चा झाली. यावेळी उपस्थितांनी आपापली मते मांडली. जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडुन आणून महाविकास आघाडीचे हात बळकट करायचे. त्यासाठी बुथ कमिटी सक्षम करणे आणि बुथ कमिट्यांच्या सदस्यांमार्फत मतदारांकडे पक्षाने केलेले कार्य व पक्षाचे ध्येय धोरण पोहचविणे. महायुतीने महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर महाराष्ट्राच्या अनेक योजना रद्द केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना र्भुदंड पडला आहे. गेल्या १० वर्षात पुण्यात भाजपाचे खासदार असून पुण्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली हाजारो रूपये खर्च केले परंतु पुणे सिटी स्मार्ट झालेली नाही. वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही, वाढते प्रदुषण, पाणी प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न आदी प्रश्न प्रलंबित आहे हे सर्व मुद्दे जनतेपुढे मांडले पाहिजे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी निवडुन येणार असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

     यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जैन यांचे अल्पश: आजाराने निधन झाले उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रध्दांजली वाहिली.

     यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, आबा बागुल संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, चंदूशेठ कदम, गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, सुनिल शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, यशराज पारखी, राहुल शिरसाट, हेमंत राजभोज, अजित जाधव, राजू ठोंबरे, अक्षय माने, नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, संग्राम खोपडे, गुलाम हुसेन खान, ऋषीकेश बालगुडे, आशितोष शिंदे, अभिजीत गोरे, विक्रम खन्ना, आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×