बीडमराठवाडामहाराष्ट्रराजकीय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटच्या माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी इम्रान खान यांची निवड
माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

एस.एम.युसूफ़ | विशेष प्रतिनिधी
माजलगाव (जनमंथन वृत्तसेवा) : शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पठाण इम्रान खाँन खय्युम खाँन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटच्या माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांच्या हस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार माजलगाव तालुकाध्यक्ष मनोहर डाके यांनी इम्रान खाँन पठाण यांची माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे. संघटना बांधणीसाठी, पक्ष बळकटीसाठी, पक्ष मजबुत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी कटीबद्ध राहावे असे निवड पत्र देताना माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी म्हटले. यावेळी शहर अध्यक्ष शकील, कचरु खळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या निवडीबद्दल पक्षाचे विधानसभा अध्यक्ष नारायण डक, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दयानंद स्वामी यांनी इम्रान खान यांचा पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देत हृदयी सत्कार केला.