पुणेकलामहाराष्ट्रसामाजिक

७ जानेवारी रोजी ‘संगीतसुधा’ कार्यक्रम

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

Spread the love

पुणे (जनमंथन वृत्तसेवा) : भारतीय विद्या भवन (Bhartiya Vidya Bhavan) आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Infosys Foundation) सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘संगीतसुधा’ (Sangeet Sudha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दीपश्री फाटक – शेठजी (अमेरिका) (Deepashri Phatak – Shethji) सादर करणार आहेत. शास्त्रीय, उप शास्त्रीय आणि सुगम संगीत त्या सादर करणार आहेत. त्यांना पुष्कर महाजन (तबला) (Pushkar Mahajan), लीलाधर चक्रदेव (हार्मोनियम) (Leeladhar Chakradeo) हे साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम शनीवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता (Senapati Bapat Road) येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९९ वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे (Prof. Nandakumar Kakirde) यांनी ही माहिती दिली.

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
×