पुणेगुन्हेगारीमहाराष्ट्र
पाच लाखांच्या हार्डवेअर साहित्यावर चोरट्यांकडून डल्ला
भोर (जनमंथन वृत्तसेवा) : भोर येथील रामबाग रस्त्यालगत वर्दळीच्या मार्गावर असलेल्या अविनाश पवार यांच्या जागेत असणाऱ्या अंबिका हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स स्टोअर्स या दुकानाचा पत्रा कापून चोरांनी दुकानातील साहित्य चोरी केल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास पाच लाखांच्या हार्डवेअर साहित्यावर चोरट्यांकडून डल्ला मारण्यात आले. दुकानदाराने सकाळी दुकानं उघडल्यानंतर, दुकानातील सामान अस्ताव्यस्त असलेले आढळले, त्यानंतर ही चोरीची घटना उघड झाली.
पोलिसांकडून चोरांचा शोध सूरू आहे. परिसरात दुकानं फोडीच्या, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं दुकानंदार धास्तावलेत, पोलिसांसमोर या चोरांचा शोध घेण्याचं मोठं आवाहन निर्माण झाले आहे.